How to keep your mobile safe from hackers |तुमचा मोबाईल हॅकरपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही एक गोष्ट करा

How to keep your mobile safe from hackers

Technology : स्मार्टफोन ही आजच्या काळात गरज बनली आहे.  पण आपण त्याचा जितका जास्त वापर करतो तितका पर्सनल व आर्थिक माहिती गमावण्याचा धोका वाढतो.

यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या (NSA) रिपोर्टमध्ये, आपण आपले फोन आणि त्यातला डेटा कसा सुरक्षित ठेवू शकतो हे सांगितलंय. एनएसएच्या रिपोर्टमध्ये हॅकर्सपासून बचावासाठी अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.

How to keep your mobile safe from hackers

फोन रीस्टार्ट करा

यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या (NSA) रिपोर्टमध्ये म्हटलंय, की अँड्रॉइड आणि आयफोन युझर्सनी काही दिवसांतून एकदा त्यांचे स्मार्टफोन रीस्टार्ट करावेत. फोर्ब्जच्या माहितीनुसार, अलीकडेच समोर आलेल्या या अनेक वर्षं जुन्या एनएसए डॉक्युमेंट्समध्ये स्मार्टफोनच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरवण्यात आला होता.

मालवेअर अटॅक टाळण्यासाठी स्मार्टफोन वेळोवेळी रीस्टार्ट करत राहा, असं त्यात म्हटलंय. यामुळे मालवेअरच्या धोक्यापासून फोन सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते.

डॉक्युमे्ंट्समध्ये मेन्शन केलेले फोन 2010 च्या सुरुवातीचे आहेत आणि त्यात होम बटण असलेले आयफोन आणि काही सॅमसंग गॅलेक्सी डिव्हायसेसचा समावेश आहे. पण एनएसएचा हा सल्ला अजूनही लागू होतो.

कदाचित हे फूलप्रूफ नाही; पण एनएसएच्या मते तुमचे डिव्हाइस रीस्टार्ट केल्याने काही धोके रोखण्यात मदत होऊ शकते. फोन सुरक्षित ठेवण्याबाबत डॉक्युमेंटमध्ये इतर अनेक टिप्स दिल्या आहेत.

फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी एनएसएने NSA दिलेले सल्ले

  • तुमचा फोन अपडेट ठेवा : फोनमधली ॲप्स आणि तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम नियमितपणे अपडेट करा.
  • ऑथोराइज्ड ॲप स्टोअरमधून डाउनलोड करा : मालवेअरपासून बचावासाठी ॲपल ॲप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरसारख्या ऑथोराइज्ड स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करा.
  • लिंक्सकडे लक्ष द्या : लिंक्स किंवा अटॅचमेंट्सवर क्लिक करणं टाळा. त्या सहसा मालवेअर पसरवण्यासाठी वापरल्या जातात.
  • चार्जर : फोन चार्ज करण्यासाठी, फोनसोबत आलेला किंवा विश्वासार्ह ब्रँडचा चार्जर वापरा आणि पब्लिक यूएसबी चार्जिंग स्टेशन टाळा.
  • सार्वजनिक वायफाय वापरू नका : सार्वजनिक वायफाय नेटवर्क सहजपणे हॅक केली जाऊ शकतात. त्यामुळे खूप गरजेचं असल्यास व्हीपीएन वापरा. ते तुमचं इंटरनेट सुरक्षित ठेवेल.
  • ब्लू-टूथ बंद ठेवा : काम नसताना ब्लूटूथ बंद ठेवा, जेणेकरून इतर कोणतंही अनोळखी डिव्हाइस तुमच्या फोनशी कनेक्ट होऊ शकणार नाही.
  • तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी, कमीत कमी सहा अंकांचा मजबूत पासकोड वापरा आणि फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट यांसारखी फीचर्सदेखील वापरा.

Leave a Comment